Saturday, March 25, 2023
More
    Homeपनवेलपनवेल शहर23 मार्च रोजी नैनाविरोधी वाहनांचा सिडको भवनवर धडक मोर्चा

    23 मार्च रोजी नैनाविरोधी वाहनांचा सिडको भवनवर धडक मोर्चा

    नवीन पनवेल दि. 17 (प्रतिनिधी) : 23 मार्च रोजी नैनाविरोधी वाहनांचा धडक मोर्चा सिडको भवन वर धडकणार आहे. या धडक मोर्चात 4 हजार पेक्षा अधिक वाहने घेऊन नागरिक सिडको वर जाणार आहेत. याबाबतची बैठक पनवेल येथे पार पडली. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, काशिनाथ पाटील, नारायण घरत, विलास फडके, राजेश केणी, शेखर शेळके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

    नैना आम्हाला नको आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमची जमीन तर सोडा पण या मातीचा एक कण देखील देणार नाही अशा पद्धतीची भूमिका शेतकर्‍यांनी ठेवलेली आहे. आपल्याला बलाढ्य शक्ती विरुद्ध लढा लढायचा आहे व नैनाला नमवायचं आहे असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले. शेतकरी, रहिवासी हे 23 मार्चला आपल्या दुचाकी, रिक्षा, कार घेऊन सिडकोवर धडकणार आहेत. सध्या सुरू असलेल्या गाव बंद आंदोलनाला गावागावात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वाहनांच्या धडक मोर्चात प्रत्येक गाडीला काळा झेंडा कंपल्सरी असून ज्याला पक्षाचा झेंडा लावायचा आहे त्यांनी ते देखील लावावे असे आवाहन राजेश केणी यांनी केले आहे.

    आता निर्णायक लढाईसाठी सज्ज व्हावे लागेल, आपण नैना विरुद्ध जनजागृती तर जोरदार करतच आहोत, त्यामुळे जनतेला त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची जाणीव झालेली आहे, प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपल्याचं यावेळी सांगण्यात आले. या जमिनी आपल्या पूर्वजांनी राखून ठेवलेल्या आहेत, तीच रक्षण करणे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आपल्या भाकरीवर लाथ मारणार्‍या नैनाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसून चालणार नाही यासाठी आपापसातील हेवेदावे विसरून आणि पक्षीय चपला बाजूला ठेवून नैना विरोधातला लढा यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. 23 मार्च रोजीच्या नैनाविरोधी वाहनांच्या सिडको भवनवर धडक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    error: Content is protected !!
    %d bloggers like this: