Sunday, June 11, 2023
More
    Homeमहाराष्ट्रमुंबई‘स्वराज’च्या राजकीय दहशतीवर ‘पवार’ नावाची मात्रा!

    ‘स्वराज’च्या राजकीय दहशतीवर ‘पवार’ नावाची मात्रा!

    दगडखाणी, क्रेशरप्रकरणी शरद पवारांचा जिल्हाधिकार्‍यांना थेट फोन
    पवारांना दिली प्रशांत पाटील, कांतीलाल कडू यांनी सविस्तर माहिती

    मुंबई दि. 25 (प्रतिनिधी) ः नवी मुंबईतील प्रामुख्याने पनवेल महसूल क्षेत्रातील दगड खाणी आणि क्रेशरच्या उत्पादनांवर एकतर्फी आर्थिक मजल मारणार्‍या स्वराज कंपनीविरोधात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील आणि पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू तसेच 27 गाव प्रकल्पग्रस्त संघटनेचे प्रतिनिधी सचिन केणी यांनी भेट घेवून माहिती दिली. त्यावेळी पवार यांनी रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना थेट फोन लावून सूचना केल्या.

    आज, गुरुवारी (ता. 25) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील दालनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रशांत पाटील यांच्या शिष्टमंडळाने भेट घेवून अर्ध्या तासाहून अधिक वेळ सविस्तर चर्चा केली. यावेळी पवारांनी माहिती ऐकून घेतली. काही महत्त्वाच्या सूचना केल्या. निवेदनांवर नजर टाकली आणि थेट रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना फोन केला.

    काहींच्या दगडखाणी आणि क्रेशर सुरु आहेत आणि काहींच्या जोरजबरदस्तीने बंद केल्या जात आहेत. तिकडे स्वराज नावाची कंपनी स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करीत असल्याची तक्रार आपल्याकडे आली असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले.
    तेव्हा समोरून जिल्हाधिकारी यांनी संबंधितांकडून माहिती घेवून आपल्याला कळवितो, असे पवारांना सांगितले. यावर आपले सहकारी प्रशांत पाटील आणि कांतीलाल कडू आपल्याकडे येतील आणि त्यासंबंधी चर्चा करतील, असेही जिल्हाधिकारी म्हसे यांना सांगितले.

    यावेळी झालेल्या विस्तारित चर्चेत क्रेशर मालक, दगड खाण चालक यांच्यावर होत असलेला अन्याय आणि महसूल यंत्रणेला हाताशी धरून राज्य मंत्रीमंडळातील काही सदस्य तसेच त्यांचे नातेवाईक व्यवसायावर टाच आणत असल्याचे प्रशांत पाटील, कांतीलाल कडू आणि सचिन केणी यांनी निदर्शनास आणून दिले.
    पवार यांनी या महत्वपूर्ण विषयाकडे गांभीर्याने लक्ष घातल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजणार आहे. तसेच महसूल यंत्रणेलाही झटका बसणार आहे.

    पनवेल प्रांतांशीही साधला संवाद! : खासगी कंपनीच्या कामासाठी चिंध्रण परिसरातील शेतकर्‍यांवर जबरदस्ती करुन त्यांच्या शेतातून अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनी टाकण्याची जुलूमशाही सुरु असल्याची तक्रार तेथील शेतकर्‍यांनी शरद पवारांकडे मांडताच लगेच पनवेलचे प्रांताधिकारी राहुल मुंडके यांना फोन करुन माहिती घेतली आणि काही सूचनाही पवारांनी त्यांना केल्या.
    उद्या नवी मुंबईत पत्रकार परिषद : स्वराज कंपनीच्या कटकारस्थानाचा पर्दापाश करण्यासाठी उद्या नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशनसमोरील अरुणाचल भवनमध्ये सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील आणि पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू याप्रकरणी सविस्तर माहिती देणार आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    error: Content is protected !!
    %d bloggers like this: