Sunday, June 11, 2023
More
  Homeनवी मुंबईउरणसुप्रीम कोर्टाचा निकाल सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा शिवसेना उपनेते विजय कदम यांचे प्रतिपादन

  सुप्रीम कोर्टाचा निकाल सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा शिवसेना उपनेते विजय कदम यांचे प्रतिपादन


  उरण दि 22(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष बाबत नुकताच सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे आणि या निकालाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी आदेश दिलेले आहेत त्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर बैठकीचा आयोजन करून पदाधिकार्‍यांना सूचना देण्यात येत आहेत.


  त्याचाच एक भाग म्हणून शनिवार दिनांक 20 मे 2023 रोजी शिवसेना उरण तालुक्याची बैठक नवीन शेवा शाखेत संपन्न झाली, यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना उपनेते व कोकण समन्वयक विजय कदम म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचा निकाल हा आपल्या बाजूने लागलेला आहे आणि तो कशा पद्धतीने लागलाय लागलेला आहे हे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवा जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेचे भाजप व शिंदे गट यांनी केलेल्या गलिच्छ राजकारणाचा एक रोष निर्माण होईल तसेच त्याचप्रमाणे येणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार्‍या माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांना पुन्हा आमदार करून रायगड जिल्ह्याचा शिवसेनेचा पहिला मंत्री होण्याचा सन्मान द्या असे आवाहन केले तर माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी कार्यकर्त्यांना व सर्व शाखाप्रमुखांना सुप्रीम कोर्टाचा आदेश हा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले व येणार्‍या सर्व निवडणुकीमध्ये पक्षासाठी सर्व पदाधिकार्‍यांनी सक्रिय होण्याची विनंती केली, सदर वेळी जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख केसरीनाथ धुरी, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांची भाषणे झाली तर सूत्रसंचालन उपतालुका संघटक के एम घरत यांनी केले व आभार प्रदर्शन पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर यांनी केले.
  सदर बैठकीसाठी उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहर प्रमुख विनोद म्हात्रे, महिला आघाडीच्या जिल्हा उपसंघटिका ममता पाटील, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, तालुका उपसंघटिका मनीषा ठाकूर, अल्पसंख्यांक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, महिला तालुका अध्यक्ष हुसेना शेख, शहर अध्यक्ष मुमताज भाटकर, शहर उपाध्यक्ष सायरा खान, शाखा संघटिका हसीमा सरदार, रुकसाना सय्यद, विभागप्रमुख एस के पुरो, अनंत पाटील उपविभागप्रमुख राजन कडू,ज्येष्ठ कार्यकर्ते मनोज पाटील, सुभाष तांडेल, नितीन ठाकूर व उरण तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच व शिवसैनिक उपस्थित होते सदर बैठकीचा नियोजन नवीन शेवा शाखाप्रमुख शैलेश भोईर, उपशाखाप्रमुख अशोक म्हात्रे, परशुराम ठाकूर,महिला आघाडीच्या मयुरी घरत, शुभांगी भोईर, मनीषा घरत, जागृती घरत व कार्यकर्त्यांनी केले होते.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  error: Content is protected !!
  %d bloggers like this: