नव वर्षातील पहिला सण
सुप्रभात आनंदाची
तिळगुळ घ्या गोड बोला
मैत्री राहो तुमची

नाती ऋणानुबंधाची,
फेसबुक वर जमली
कोण कोठले इथे भेटले
मैफील आपुली सजली
माळ अर्पिते रोज येथे
गुंफुन शब्द फुलांची
तिळगुळ घ्या गोड बोला,
मैत्री राहो तुमची
सण येती सुंदर असे
त्यांचे स्वागत करुया
निर्भयता मनी ठेवुनी
जीवन गाणे गाऊया
सुख दुःखाच्या सागरात,
वाट ही पैलतिराची
तिळगुळ घ्या गोड बोला
मैत्री राहो तुमची

ज्योती उपाध्ये.