Sunday, June 11, 2023
More
    Homeपनवेलपनवेल शहरशिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोलीत सकल मराठा जोडो अभियान...

    शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोलीत सकल मराठा जोडो अभियान मोहीम सुरू


    पनवेल दि. 23 (वार्ताहर) : पनवेल परिसरामध्ये रहात असलेल्या सकल मराठा समाजाला एकत्रित करण्यासाठी मराठा जोडो अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यांची कळंबोली येथे नोंदणी गुगल फॉर्म च्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


    घाटमाथ्यावरून नोकरी व्यवसाय निमित्त स्थिरावलेला सकल मराठा समाज मोठ्या संख्येने सिडको वसाहतींमध्ये राहतो. त्यातल्या त्यात कळंबोली मध्ये ही संख्या जास्त आहे. मराठा आरक्षण त्याचबरोबर विविध ठिकाणी आवश्यक असणार्‍या सवलती शाळा महाविद्यालयातील प्रवेश त्याचबरोबर नोकरीमध्ये प्राधान्य हे व इतर अनेक प्रश्न समाजासमोर आहेत. मराठा आरक्षणासाठी गेल्या काही वर्षापासून मोठा लढा सुरू आहे. समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याच्या उद्देशाने सकल मराठा समाज जोडो अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. कळंबोली येथे गुगल फॉर्म भरण्याचा उपक्रमाला रामदास शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला. हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच समाज जोडो अभियान हाती घेण्यात आले आहे. यावेळी संदीप जाधव,विवेक पाटील ,किरण नागरगोजे, अवधूत साळुंखे,संजय जाधव आबासाहेब इंगळे,तुकाराम सूर्यवंशी,सागर मोरे,दीपक शिंदे रत्नमाला शिंदे, सकल मराठा समाज कळंबोली मराठा समाज उपस्थित होते. कळंबोली येथील सकल मराठा समाज कुटुंबातील सर्व सदस्यांनी मराठा जोडो अभियान गूगल फॉर्म भरावा,आपल्या आजूबाजूला आपला मराठा समाज बांधव असेल तर त्यांना ही सहकार्य करून त्या कुटुंबाचा ही हींींिी://षेीाी.सश्रश/3ळषेऊ2झॠ5गाङणनएत8 या लिंक वर गूगल फॉर्म भरावा. असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    error: Content is protected !!
    %d bloggers like this: