रावे दि. 20 (प्रतिनिधी): शिवतेज मित्र मंडळ, नवीन पनवेल आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पेण तालुक्यातील रावे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आला होता.
नवीन पनवेल येथील शिवतेज मित्र मंडळ मागील अनेक वर्ष सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असून मंडळाच्या स्थापनेपासून आजवर त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत.

शिवतेज मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत विविध वंचित समुहांच्या सक्षमिकरणासाठी आरोग्याशी निगडित कार्यक्रमही राबविले आहेत. तसेच सहयोगी संस्था आर झुनझुनवाला हेदेखील नर्सिंग, लॅब टेक्नॉलॉजी व ऑपटॉमेट्री तज्ञांकडून शिबिरात सेवा उपलब्ध करून देत आहे.
ग्रामीण भागात बहुतांशी ठिकाणी आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा अभाव असतो, सरकारी दवाखाने असले तरी पाहिजे त्या सुविधा नसतात, गावात सार्वजनिक आरोग्य उपकेंद्र असूनही सातत्याने बंद अवस्थेत असते, परिणामी अशावेळी गावामध्ये लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते, खाजगी दवाखान्यात पैशाच्या अभावाने अशा लोकांची फसवणूक केली जाते. हे होऊ नये म्हणून काही सामाजिक संस्था अशा भागात जाऊन मोफत आरोग्य तपासणी व योग्य वैदयकीय सल्ला देण्याचा प्रयत्न करत असतात. आजही गावातील वयस्कर लोकांमध्ये ’मोतीबिंदू’ मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने तसेच लहान मुलांना डोळ्यांचे आजार आढळून येत असल्याने शिवतेज मित्र मंडळ आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमार्फत योग्य पद्धतीने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. या शिबिरादरम्यान 170 नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली, त्यातील एकूण 16 रुग्णाघमध्ये मोतीबिंदूची लक्षणे दिसून आली, अशा 16 रुग्णांवर नवीन पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.
या उपक्रमाला रावे गावचे गाव पुढारी राजा पाटील, डॉ.संचित गावं, क्षितिज पर्वचे संपादक सनिप कलोते, कर्नाळा न्युजचे संपादक दत्ता मोकल, युथ महाराष्ट्रच्या संपादिका दीपाली पारसकर यांनी भेट दिली, त्यांचे शिवतेजचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी स्वागत केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश पाटील, डॉ.सपना शर्मा, परिचारिका श्रुती पेंडणेकर, जुली जोसेफ, लक्ष्मी बारिया, ऑप्टिशियन मोहम्मद आसिफ,
आशा वर्कर्स दिपू पाटील, पुष्पलता पाटील, बचत गटाच्या हर्षलता पाटील, सारिका पाटील, नम्रता पाटील, शिवतेज मित्र मंडळाचे जेष्ठ सदस्य संदेश पाटील, संकेत पाटील, उमेश म्हात्रे, हरिश्चंद्र पाटील, सुदेश पाटील, अनंता पाटील, सुनंदा पाटील, सुनीता पाटील, सुवर्णा पाटील, सेजल माळी यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.