रसायनी दि 22 (राकेश खराडे ) : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या काळात मागच्या तीन वर्षात सुरक्षेच्या कारणास्तव अनेक ठिकाणी उपक्रम राबविण्यात आले नव्हते. परंतु या वर्षी संपुर्ण राज्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

याचप्रमाणे शिवजयंतीचे औचित्य साधून रसायनीतील वृंदावन फ्लोरा , चांभार्लीं याठिकाणी सोसायटी आयोजित शिवजयंती उत्सव सोहळा 2023 निमित्त साई क्लिनिक लॅबोरेटरी यांच्या वतीने रक्त तपासणी ( ब्लड चेकअप ) कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 95 नागरिकांनी रक्त तपासणी करण्यात आली . रक्त तपासणी केलेल्या सर्व नागरिकांचे कॉसमॉस सोसायटीतर्फे अभिनंदन करण्यात आले. तर साई क्लिनिकल लॅबोरेटरीचे विजय बाविस्कर , आतिश शिंदे , नयन बाविस्कर व सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.