अलिबाग,दि.23 (जिमाका):– शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी तहसिलदार सचिन शेजाळ, विशाल दौंडकर, लेखाधिकारी देवेंद्र पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.