Sunday, June 11, 2023
More
    Homeसंपादकीयअग्रलेखविकास चौखूर उधळणारा

    विकास चौखूर उधळणारा


    महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमु‘यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस अर्थखाते सांभाळत आहेत. सत्तेत आल्यानंतर या सरकारने अनेक निर्णयांचा धडाका लावला आणि अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन मेट्रो मार्गांचा शुभारंभ झाला तर काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर)ची अर्थव्यवस्था येत्या पाच वर्षांमध्ये 250 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने निश्‍चित केले आहे. महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक प्रकल्प गुजरातला गेले, अशी टीका सुरू झाली. परंतु त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मॅन्युङ्गॅक्चरिंग क्लस्टर आणि सीडॅक असे दोन प्रकल्प पुण्यात दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यातून पाच हजारजणांना रोजगार मिळेल, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्लीमध्ये केली. त्या अनुषंगाने पाहता महाराष्ट्रामध्ये रोजगारनिर्मिती वाढवून निवडणुकीची तयारी केली जात आहे का, असा पश्‍न पडतो. येत्या काळात महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका, तालुका पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था आदी ठिकाणी निवडणुकीचे वातावरण आहे. त्या निमित्ताने जोरदार विकासकामे होत आहेत. आजघडीला मुंबई आणि परिसरात कोट्यवधी लोक वास्तव्याला आहेत. कितीही प्रयत्न केले गेले तरी इथे रोजगारासाठी येणार्‍या लोकांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मोठ्या प्रमाणात व्यावसायिकरण झाल्यामुळे जागेची किंमत प्रचंड प्रमाणात वाढून मुंबईहून आजुबाजुच्या परिसरात स्थलांतरीत होणार्‍यांची संख्याही मोठी आहे. परिणामी, या भागात विविध राजकीय पक्षांचे समर्थक, कार्यकर्ते यांचे नवे जाळे विणले जात आहे. यामुळेच मुंबईचा विस्तार होत आहे, तसतशी या क्षेत्रावर पकड निर्माण करण्याची, आपला वरचष्मा प्रस्थापित करण्याची संधी राजकारण्यांनाही मिळत आहे.
    महाराष्ट्रात दोन लाख कोटी रुपयांचे 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधानांनी मुंबईत भरलेल्या रोजगार मेळाव्यात ऑनलाइन भाषण करताना दिली होती. गेल्या आठ वर्षांमध्ये देशभरात आठ कोटी महिला स्वयंसेवी सहाय्यता गटाद्वारे परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत आणि त्यांना साडेपाच लाख कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी रुपये आणि रस्ते विकास प्रकल्पांकरिता 50 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून लाखो तरुणांना नोकर्‍या मिळतील, असेही पंतप्रधानांनी सांगितले. देशात मुंबईचे स्थान आगळेवेगळे असून महाराष्ट्राच्या विकासातही या महानगरीचे मोठे योगदान आहे. मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासाची सुत्रे एमएमआरडीएवर सोपवण्यात आली आहेत. एमएमआर विभागाची अर्थव्यवस्था विस्तारण्यासाठी प्रकल्प प्रस्ताव तयार करण्याच्या निविदा जारी करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली आहे. यामागे मुंबईच्या आसपासची गावे आणि नगरे मु‘य शहराला जोडण्याचा विचार आहे. एमएमआर क्षेत्राचे सध्याचे राष्ट्रीय ठोकळ उत्पादन (जीडीपी) 140 अब्ज डॉलर्स इतके आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबईचे दरडोई जीडीपी दुप्पट म्हणजे 4500 डॉलर्स इतके आहे. देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा दहा टक्के आहे आणि राज्याच्या हिस्स्यात एमएमआरचा वाटा एकतृतीयांश इतका आहे. एमएमआर क्षेत्र 6328 चौरस किलोमीटर इतके आहे.
    2011 च्या जनगणनेप्रमाणे या क्षेत्राची लोकसं‘या दोन कोटी 35 लाख आहे. नऊ महानगरपालिका, नऊ नगर परिषदा, एक नगरपंचायत आणि हजारपेक्षा जास्त गावे या भागात येतात. शिवडी-न्हावा शेवा मुंबई ट्रान्सहार्बर लिंकमुळे मुंबई शहर आणि आसपासचा भाग यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. हा सागरी पूल येत्या डिसेंबरमध्ये सुरू होईल. 22 किमी. लांबीचा शिवडी-न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प हा देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग आहे. तसेच नवी मुंबईत नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. बेलापूर ते गेटवे ऑङ्ग इंडिया, मुंबई अशा जलप्रवासाचे नियोजन करण्यात आले असून वॉटर टॅक्सीसेवा सुरू होत आहे. त्यामुळे नवी मुंबईतून ङ्गक्त तासाभरात थेट मुंबईच्या दक्षिण भागात जाता येईल. दिवसेंदिवस खासगी वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे रस्तेमार्गे जाणे हे वेळखाऊ ठरत आहे. विरार ते अलिबाग असा 126 किलोमीटरचा मल्टिमोडल कॉरिडॉर आकाराला येणार आहे. त्याद्वारे एमएमआरमधील प्रत्येक महत्त्वाचे नगर मुख्य शहराला जोडण्यात येणार आहे. या वाहतुकीच्या कॉरिडॉर्सच्या जवळ एमएमआरडीएतर्ङ्गे ‘ग‘ोथ सेंटर्स’ उभारण्यात येणार आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    error: Content is protected !!
    %d bloggers like this: