Sunday, June 11, 2023
More
  Homeरायगडकर्जतरोटरी क्लबच्यावतीने मोहोपाडा बस थांबा साकारणार

  रोटरी क्लबच्यावतीने मोहोपाडा बस थांबा साकारणार


  रसायनी दि. 24 (राकेश खराडे ) : रसायनी- पाताळगंगा परिसरातील बाजारपेठेचे मुख्य केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोहोपाडा शहरात प्रवेशद्वारानजीक बसथांब्याची दुरावस्था असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


  रसायनी-पाताळगंगा हे औद्योगिक क्षेत्र असल्याने मोहोपाडा परिसर नेहमीच गजबजलेला असतो.येथे बाजारहाट करण्यासाठी येणार्‍या नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे.येथील वासांबे – मोहोपाडा ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास 63000 च्या आसपास असल्याचे दिसून येते. येथील नागरिकांना यावेळी एसटी बसची वाट पाहत मोहोपाडा मच्छी बाजाराजवळील बस थांब्यावर उभे राहत असताना अनेकांना मच्छीबाजारातील वासामुळे पोटात मळमळणे,उलटी होणे, डोकं दुखणे आदी व्याधींचा त्रास होत असे. याअगोदर रिक्षा थांब्याजवळ एचओसी बसथांबा आहे परंतु त्याची दुरावस्था झाल्याने या बसथांब्याचा कोणीही प्रवासी वापर करीत नाही.येथील बसथांब्याची डागडुजी अथवा नवीन व्हावे असे प्रवासी वर्गातून मागणी होत होती. हि समस्या रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित शहा यांनी लक्षात घेऊन त्याजागी प्रवासी व नागरिकांसाठी नवीन बसथांबा उभारण्याचे ठरवून त्याचे भूमिपूजन माजी सरपंच संदिप मुंढे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मोहोपाडा नविन पोसरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील,रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित शहा, सेक्रेटरी धिरज जैन, सहाय्यक सेक्रेटरी विजय पाटील, खजिनदार देवेंद्र महिंद्रकर,माजी अध्यक्ष गणेश काळे, बाळकृष्ण होनावळे सर,पिई रेश्मा कुरुप, शानबाग सर, संदिप साबळे, मनोहर पाटील आदी रोटरीयन उपस्थित होते. रोटरी क्लबच्यावतीने मोहोपाडा रिक्षा थांब्याजवळ बस थांबा साकारणार असल्याने प्रवाशांसह नागरिकांनी रोटरीचे आभार मानले.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  error: Content is protected !!
  %d bloggers like this: