Sunday, June 11, 2023
More
  Homeरायगडअलिबागरोजगार प्राप्तीची सुवर्णसंधी! खोपोली मध्ये महारोजगार मेळावा!

  रोजगार प्राप्तीची सुवर्णसंधी! खोपोली मध्ये महारोजगार मेळावा!

  अलिबाग दि. 25 (प्रतिनिधी) : दिनांक 27 मे 2023, शनिवार रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड- अलिबाग यांच्या वतीने शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी ’खोपोली’ येथे ’पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार ’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यास रायगड जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नामांकित उद्योजकांची उपस्थिती असणार आहे. यासोबतच रोजगार व स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध अर्थिक विकास महामंडळे, जिल्हा उद्योग केंद्र यांचा सहभाग असणार आहे.

  सदर मेळावा हा खोपोली येथील ’श्री समर्थ मंगल कार्यालय’, समर्थ ढाब्याशेजारी, जाधव फार्म, मुंबई -पुणे हायवे येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत पार पडेल. या मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा व आपल्या आवश्यक कागपत्रांसह मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती. अमिता पवार यांनी केले आहे

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  error: Content is protected !!
  %d bloggers like this: