पेण दि. 17 (प्रतिनिधी) : जीवनशैलीत अमुलाग्र बदल करून व्यायाम व समतोल आहाराच्या माध्यमातून सुदृढ आरोग्य मिळविणार्या महिलांचा पेण येथे रेडरॉक्स फिटनेस क्लब तर्फे सन्मान करण्यात आला.

नुकतीच अहमदाबाद येथे पार पडलेल्या फिट इंडिया मिशन कार्यक्रमात सिनेतारका दिया मिर्झा यांच्या हस्ते तरन्नुम काझमी ह्याची हेल्थ अँड न्युट्रीशन कोच म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे रेडरॉक्स तर्फे महिलांनी तरन्नुम काझमी यांचा सत्कार केला.
यावेळी तरन्नुम काझमी यांनी बदलती जीवनशैली व निरोगी आरोग्याचा गुरुमंत्र या विषयावर महिलांचे प्रबोधन केले. हृदयरोग, मुळव्याध, मधुमेह, उच्च रक्तदाब या व्याधी बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आहेत. आपली जीवनशैली बदलून या व्याधींवर आपल्याला मात करणे सहज शक्य आहे. स्वास्थ विषयक जागरूकता, दैनंदिन जीवनातील आरोग्य आणि व्यायाम व समतोल आहाराने आपण निरोगी व सुदृढ राहू शकतो असे प्रतिपादन काझमी यांनी या केले. या व्याख्यानाला पेण मधील महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी सोनू म्हात्रे 20 दिवसात 5 किलो वजन कमी केले. सौ. तनुजा कोळी यांनी 30 दिवसात 4 किलो वजन कमी केले. दिक्षिता टेंबे यांनी 4 किलो वजन कमी केले. वैशाली जोशी यांनी 4 किलो तर दिपाली जोशी यांनी 2 किलो वजन कमी केल्याने त्यांना रेडरॉक्स वॉरियर सर्टिफिकेट व पारितोषिक देऊन सौ. तरन्नुम काझमी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कु मदुरा शेडगे, कु अर्पिता लोहार ह्यांना सेल्फी क्वीन हे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. क्लब तर्फे 30 महिलांना सन्मानीत करण्यात आले. रेड रॉक्स फिटनेस क्लब तर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. व्यायाम व समतोल आहाराचे महत्त्व यावेळी महिलांना पटवून देण्यात आले.