रसायनी दि. 22 (राकेश खराडे) : पाताळगंगा रसायनी हे औद्योगिक क्षेत्र असून याठिकाणी असणारे रसायनी हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे. परंतु गेले दोन वर्षापासून येथील तिकीट घर गायब झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

रसायनी परिसर हा औद्योगिक क्षेत्राने नटलेला असून या ठिकाणी रिलायन्स इंडस्ट्रीज, सिप्ला, बॉम्बे डाईंग, अल्कली याशिवाय अतिरिक्त एमआयडीसी झोनमध्ये छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत तसेच बीपीसीएल, इस्त्रो यासारखे सरकारी प्रोजेक्ट येथे कार्यरत आहेत. महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लई सारखी शैक्षणिक संस्था, केंद्र सरकारचे एनआयएसएम सेबी केंद्र याठिकाणी असून मुख्य रेल्वे स्टेशन असणार्या रसायनी रेल्वे स्टेशनमध्ये विविध कमतरता जाणवताना दिसत आहेत. शिवाय येथील तिकीट घर कोरोना नंतर जे बंद करण्यात आले ते अद्याप बंदच आहे.त्यामुळे रेल्वे प्रवास करणार्या नागरिकांची व विद्यार्थ्यांची धावपळ उडत असून त्यांना तिकीट काढण्यासाठी तीन किमी रिक्षाने प्रवास करावा लागत असून वेळ व अतिरिक्त भारही सोसावा लागत आहे.
रसायनी रेल्वे स्टेशनला गेले कित्येक वर्षांपासून कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. या ठिकाणी कोकणात जाणार्या गाड्यांची रेलचेल चालू असते. रेल्वे प्रवाशांना निवारा शेड तसेच बसण्यासाठी बाकडे नाहीत, पिण्याच्या पाणीची सुविधा नाही. तसेच महिला वर्गासाठी प्रसाधनगृह सुद्धा उपलब्ध नाही
रसायनी- पाताळगंगा हा औद्योगिक क्षेत्र असून येथे बाहेरील कामगारवर्ग मोठ्या संख्येने रेल्वेने प्रवास करत आहे.शिवाय रसायनी परिसरातील इंजिनिअरींग कॉलेज , नामांकित शिक्षण संस्था असल्याने दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी रसायनीत येतात.यावेळी या रेल्वे स्टेशनवर विविध समस्या असल्याने प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.आम्ही तुराडे ग्रामपंचायतीच्या वतीने अनेकदा पत्रव्यवहार केला परंतु रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. ः