रसायनी दि. 4 (राकेश खराडे) : दुबई येथे मिसेस इंडिया दुबई इंटरनॅशनल स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली.या स्पर्धेत रसायनीतील गणेशनगर येथे राहणारी भाग्यश्री चंदन हिने सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेत दुबईतील मॉडलिंग युवतींचा मोठा सहभाग दिसून आला.या स्पर्धेत प्रत्येकाने आपापली कला दाखवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.या स्पर्धेत रसायनीतील एचओसी स्कूलची विद्यार्थ्यीनी भाग्यश्री चंदन हिने सहभाग घेतला होता.तिचे मॉडलिंगचे शिक्षण पुणे येथे झाल्याने भाग्यश्रीला स्पर्धात्मक अनुभव होता.तिला मिसेस इंडिया दुबई इंटरनॅशनल स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सध्या भाग्यश्री नोकरीमुळे दुबईतच राहत आहे.