Saturday, March 25, 2023
More
    Homeपनवेलपनवेल शहरमौजे डुंगी गावातील प्रलंबित प्रश्न लवकरच निकाली निघणार

    मौजे डुंगी गावातील प्रलंबित प्रश्न लवकरच निकाली निघणार

    सरपंच अहिल्या नाईक यांची शिष्टाई आली कामी
    पनवेल दि. 17 ( वार्ताहर ) : तालुक्यातील मौजे डुंगी गावातील अनेक प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून यासाठी विद्यमान सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांची शिष्टाई कामी आल्याचे शासकीय बैठकीत दिसून आले आहे .

    सह व्यवस्थापकीय संचालक सिडको राजेश पाटील यांनी सदर बैठकीचे आयोजन सिडको कार्यालय येथे केले होते . या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी जरे व उपविभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके, भूमी व भूमापन अधिकारी सिडको पोटे, पनवेल तहसीलदार विजय तळेकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन मेट्रो सेंटरचे नवले तसेच पारगाव डुंगी गावच्या विद्यमान सरपंच अहिल्या बाळाराम नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नाईक, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ पाटील ,शिल्पा नाईक, माजी उपसरपंच, विकास नाईक तसेच गावातील कार्यकर्ते श्रीधर पाटील, नितेश नाईक, मधुकर नाईक, आदेश नाईक, धनराज नाईक, सुभद्रा पाटील अनेक डुंगी गावातील कार्यकर्ते प्रामाणिकपणे उपस्थित होते.

    त्यावेळी बैठकीत पात्रता आलेल्या 46 घरां पैकी 27 लोकांनी सहमती दिली आहे व 19 लोकांचे संमती बाकी आहे . या संदर्भात चर्चा झाली . तसेच गुरुचरण मधील बांधकामाना लवकरात लवकर शासनाकडून योग्य पात्रता देण्यात येईल व सर्व मधील घरांना मालकाच्या संमती 15:75% टक्के वजा करून पात्रता मिळेल या संदर्भात चर्चा झाली . त्यावेळी डुंगी गावचे पोलीस पाटील प्रमोद नाईक तसेच शैलेश पाटील , रोहिदास नाईक , धनराज नाईक तसेच दुंगी गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या सकारात्मक चर्चेमुळे लवकरच मौजे डुंगी गावातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास विद्यमान सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांनी यावेळी व्यक्त केला आहे .

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    error: Content is protected !!
    %d bloggers like this: