नवी मुंबई दि. 26 (वार्ताहर): अंमली पदार्थाची तस्करी करणा़र्यांवर वेगवगळ्या कारवाया करुन मुंबईच्या कस्टम विभागाने गेल्या वर्षभरामध्ये पकडलेला तब्बल 350 किलो वेगवेगळ्या अंमली पदार्थाची कस्टम विभागाने शुक्रवारी तळोजा येथील कंपनीमध्ये शास्रोक्त पद्धतीने नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावली. नष्ट करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाचे मुल्य आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल दिड हजार करोड रुपये इतके आहे.

मुंबई कस्टम विभागाने तसेच डीआरआयने गत वर्षभरामध्ये मुंबईसह नवी मुंबईत वेगवेगळ्या कारवाया करुन मोठया प्रमाणात अंमली पदार्थ पकडले आहे. यात 198 किलो मेटाफेटामाईन, 9 किलो कोकेन, 16.6 किलो हेराईन, 32 किलो गांजा त्याचप्रमाणे रेव्ह पार्टीसाठी वापरण्यात येत असलेले मेट्रक्सचे 81 टॅबलेट आणि एमडीएचे 298 टॅबलेट अशा एकुण 350 किलो वजनाचे अंमली पदार्थांचा समावेश होता. हा अंमली पदार्थाचा साठा कस्टम विभागाने तळोजा येथील कंपनीत नेऊन तज्ञांच्या मदतीने शास्त्राीक्त पध्दतीने ते नष्ट केले. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे संपुर्ण व्हिडीयो शूटींग देखील करण्यात आले आहे. कस्टम विभागाकडुन नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल दिड हजार कोटी रुपये किंमत असल्याची माहिती मुंबई कस्टम विभाग झोन-3चे सहाय्यक आयुक्त श्रीधर धुमाळ यांनी दिली.