पेण दि. 23 (प्रशांत पोतदार) : विकास काम काय असतो ते आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी जनतेला दाखवून दिले आहे परंतु काही लोक या विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न स्टंड बाजी करू घेत आहेत तरी आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी मंजूर केलेल्या कामांचे कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये नाही तर त्यांना शिवसेना स्टाईलने प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी बेलकडे-रोहा रस्त्याच्या विकास कामाच्या शुभारंभा प्रसंगी दिला.

माजी जिल्हा परिषद गटनेत्या मानसीताई दळवी यांच्या हस्ते बेलकडे – रोहा रस्त्याच्या कामाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावे बोलताना मानसीताई दळवी यांनी विद्यमान आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कारकिर्दीत मंजूर झालेल्या रस्ताचे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न काही जन करत आहेत.
परंतु पीडब्ल्यूडी अधिकारी व आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या विचार विनिमयाने तिसर्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम देण्यात आले त्यांचे काम उत्तम प्रकारे करण्यात येत आहे.
आमदार महेंद्रशेठ दळवी यांना कल्पना न देता काल झालेल्या स्टंट बाजी करुन क्रेडिट घेण्याचा निंदनीय प्रयत्न केला गेला याचा आम्ही निषेध करित असल्याचे सांगितले.
यावेळी माजी जि प गटनेत्या मानसीताई दळवी, जिल्हा प्रमुख राजाभाई केणी,सुरेंद्र म्हात्रे,किशोर पाटील, अनंत गोंधळी,अरुण भगत, पृथ्वीराज पाटील, प्रकाश पाटिल, जीवन पाटील,जनार्दन भगत,बाळू तेलंगे, पीडब्ल्यूडीचे अधिकारी प्रशांत ठीकरे,आदी रामराम विभागातील कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.