विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्याचा केला संकल्प
अलिबाग,दि.13(जिमाका):- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे (महाज्योती) मार्फत गएए/छएएढ/चकढ-उएढ चे प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे जिल्ह्यातील एकूण 67 विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्ड वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री.सुनिल जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आदि उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री.सुनिल जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी विद्यार्थी व त्यांचे पालक यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत शासनाच्या या योजनेतून विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड दिल्याबद्दल शासनाप्रति आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक माधुरी पाटील यांनी केले. यावेळी समाज कल्याण निरीक्षक मंदाकिनी पाटील,अंकुश पोळ, गृहपाल संदीप कदम व इतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.