
कळंबोली, दि.12 : पनवेल येथील नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी यांना भटके विमुक्त जाती जमाती कर्मचार्यांच्या, अधिकार्यांच्या पदोन्नती मधील आरक्षणाबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेऊन हे आरक्षण पूर्ववत चालू ठेवावे यासाठी निवेदन देण्यात आले. भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व आमदार माननीय प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्यासह भाजपा भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे माजी जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका महानवर, पनवेल शहर भटके-विमुक्त आघाडीचे अध्यक्ष गोपीनाथ मुंडे कळंबोली भटके-विमुक्त आघाडीचे अध्यक्ष आबा घुटुकडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते राजन पिल्ले, काकासाहेब कुत्तरवडे, धनगर समाजाचे नेते नवलराज काळे, पनवेल शहर महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुहासिनी केकाने, आघाडीच्या जिल्हा सदस्या मीनाक्षी गीते महिला मोर्चा च्या खांदा कॉलनी च्या अध्यक्षा राखी पिंपळे, आघाडीचे जिल्हा सदस्य विक्रम ठाकुर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.