Friday, March 24, 2023
More
    Homeनवी मुंबईउरणबेमुदत संपाचा जनसेवेवर परिणाम

    बेमुदत संपाचा जनसेवेवर परिणाम

    उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे): जूनी पेन्शन योजना लागू करावी तसेच विविध मागण्यांच्या अनुषंगाने दि 14 मार्च 2023 पासून उरण मधील सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालया समोर बेमुदत संप सुरु झाल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झालेला दिसून येत आहे. सलग, 3 दिवस संप सुरु आहे. आज दि. 17 रोजी संपाचा 4 था दिवस असून नगर परिषद, पंचायत समिती, तहसिल कार्यालय आदि शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. सर्वच कर्मचारी शासकीय अधिकारी संपात सहभागी झाल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत.

    शासकीय कार्यालये ओस पडली असून शासकीय कामे बंद असल्याने त्याचा प्रचंड फटका सर्व सामान्य नागरिकांना बसला आहे. सर्वसामान्य नागरिकांना संपामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 1)महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी समन्वय समिती व सी आय टी यू (उखढण )2) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना 3) भारतीय मजदूर संघ 4) म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन.या चारही समविचारी संघटना असून या चारही संघटना एकत्र येत या संघटनांनी संघर्ष समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग संघर्ष समितीच्या माध्यमातून या संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांचा शासकीय कर्मचार्‍यांचा हा लढा सुरु आहे. या चारही संघटनेचे मिळून संघर्ष समिती बनवून उरण मध्ये बेमुदत संप सुरु आहे.या संपाचा आज दि 17 रोजी चौथा दिवस असल्याचे कामगार नेते संतोष पवार यांनी सांगितले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा या संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतला

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    error: Content is protected !!
    %d bloggers like this: