माथेरान दि. 23 (मुकुंद रांजाणे) : माथेरान मध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखेत करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला जेष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर बागडे आणि माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
यावेळी उप-शहर प्रमुख प्रमोद नायक,माजी नगरसेवक प्रकाश सुतार,संदीप शिंदे,जेष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर बागडे,महिला शहर संपर्क प्रमुख प्रीती कळंबे,जेष्ठ महिला शिवसैनिक सुरेखा जाधव,लता हेंद्रे,मेघा कोतवाल, संतोष खाडे, निलेश परदेशी, सलीम शेख, अनिस भाई शेख, निखिल शिंदे, शुभम गायकवाड, सचिन काळे,किशोर कदम, अनिकेत जाधव, अमोल चौगुले,तानाजी कदम,राजु वर्पे यांसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे की, सर्वसामान्य लोकांच्या नेहमीच मदतीसाठी धावले पाहिजे. फक्त प्रॉपर्टी जमा करून पक्षाची कामे होत नाहीत तर अखंडपणे जनसेवा केली पाहिजे, एकदा निर्णय घेतला तर मागे फिरायचे नाही आपल्या निर्णयावर ठाम राहिले पाहिजे, राजकारण जरूर करा पण समाजकारण करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. तेव्हाच मतदार सुध्दा नक्कीच आपल्या बाजूने निश्चित कौल देतो. प्रकाश सुतार — माजी नगरसेवक माथेरान