कळंबोली दि. 9 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रायगड जिल्ह्याचे भव्य दिव्य अधिवेशन पनवेल येथे संभाजीराव थोरात साहेब (तात्या) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी बाबुराव हरी पालकर माजी जिल्हा अध्यक्ष यांची राष्ट्रीय सचिव; तसेच सुभाष हिरा भोपी यांची प्राथमिक शिक्षक संघाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी तर विकास नरहरी पाटील यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

या भव्य दिव्य मेळाव्यास 600 हून अधिक शिक्षक बंधू-भगिनीं उपस्थित होते. तसेच जिल्हाध्यक्ष सुभाष भोपी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन यावेळी संदीप जुईकर अध्यक्ष शिवाजी गट . एस.के.पाटील चंद्रकांत कोळी शिक्षक सेना तालुका अध्यक्ष यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह संघटनेत प्रवेश केला.
या कार्यक्रमास राज्याध्यक्ष अंबादास वाजे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी सरचिटणीस-आबासाहेब जगताप; खजिनदार उत्तमराव वायाळ राष्ट्रीय अध्यक्ष एन वाय. पाटील राष्ट्रीय सरचिटणीस बाळासाहेब झावरे पेण पतपेढी चेअरमन सूर्यकांत करंजीकर, उरण पतपेढी च्या चेअरमन राजश्री राजेंद्र मोकल मो. रा. म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी करण्याकरिता जयदास घरत, राजेंद्र मोकल, गंगाधर पाटील, नवनीत गावंड, प्रभाकर घरत, दिपक घरत, प्रकाश काथारा, राजेंद्र शिंदे, प.ज.पाटील, संजय सावळे, नितीन कुडावकर, संजय पाटील, संदीप पाटील, केसरीनाथ दरे, चंद्रकांत सांबरी, वामन हिंदोळा या सर्वांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुंदर, मनमोहक सूत्रसंचालन प्रशांत पाटील आणि कविता गावंड यांनी केले.