पेण दि. 23 (प्रतिनिधी) : पेण-खोपोली मार्गावर महानगर गॅस टेम्पो व पॅशन प्रो मोटारसायकल मध्ये अपघात झाला. या अपघातात पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आराव येथील निलेश दाजी मोरे ( वय 45) व त्यांची पत्नी निकिता निलेश मोरे ( वय 42) हे दांपत्य त्यांची मोटारसायकल पॅशन प्रो क्र.चक 06 इइ 8659 ने पेण ते आराव असा प्रवास करीत होते. सावरसई गावाजवळील अवघड वळणावर महानगर गॅस टेम्पो क्र.चक 43 इद 3115 चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरून येणार्या पॅशन प्रो मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने निलेश मोरे याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी निकिता मोरे ही गंभीर जखमी झाली आहे. अपघाताची माहिती कळताच अपघातग्रस्तांचेवाली कल्पेश ठाकूर यांनी मोरे दाम्पत्यांना रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निकिता मोरे यांना पुढील उपचारासाठी एम. जी. एम. कामोठे येथे पाठविण्यात आले आहे. रायगड वाहतूक पोलीस व पेण पोलीसांनी घटनास्थळी जावून दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.