रसायनी दि 17 (राकेश खराडे ) : भारत सरकारची डीएसटी इन्स्पायर फॅकल्टी फेलोशिप आढावा बैठक 16-17 जानेवारी 2023 रोजी दोन दिवसीय महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (स्वायत्त) डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई कॅम्पस येथे सोमवारपासून सुरु करण्यात आली.याचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग ( डीएसटी), भारत सरकारची इन्स्पायर फॅकल्टी पुनरावलोकन बैठक महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (स्वायत्त ) डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई कॅम्पसमध्ये करण्यात आली . केमिकल सायन्स, फिजिकल सायन्स, मॅथेमॅटिकल सायन्स, अर्थ अँड टमॉस्फिअर सायन्स, लाईफ सायन्स आणि बायोमेडिकल या विषयांच्या क्षेत्रात काम करणार्या भारतभरातील विविध नामांकित संस्था आणि संशोधन प्रयोगशाळेतील सुमारे 150 फॅकल्टी फेलो यावेळी उपस्थित होते.यावेळी प्राचार्य अमजत स्पॉनर, डायरेक्टर सिबी एटी, प्राचार्य एम जे महाले, प्राचार्य रामदास स्वामी, डॉ.बि.एन.तिवारी, डॉ.सुप्रीम आदी मान्यवर उपस्थित होते.
आयआयटी, सीएसआयआर, टीआयएफआर, आयएसएम इत्यादी जगप्रसिद्ध संस्था आणि संशोधन प्रयोगशाळेतील प्रख्यात शास्त्रज्ञ, पॅनेल कोऑर्डिनेटर आहेत.सदस्य आणि डीएसटी अधिकारी फॅकल्टी फेलोने सादर केलेल्या संशोधन कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पिल्लई ग्रुप ऑफ इनस्टिट्यूशन्सच्या डॉ. निवेदिता श्रेयांस या कार्यक्रम समन्वयक आहेत आणि डॉ. बिस्वजित पांडा हे डीएसटी इन्स्पायर विभाग दिल्लीतील डॉ. रुक्मणी यांना मदत करण्यासाठी या बैठकीसाठी फॅकल्टी कोऑडीनेटर म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.या कार्यक्रमाची सुरुवात सोमवारपासून करण्यात आली.यावेळी या फेलोशिप आढावा बैठकीत भारतभरातील विविध नामांकित संस्थांचे पदाधिकारी व संशोधन प्रयोगशाळेतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या सिईओ डॉ निवेदिता श्रेयांश यांनी अथक परिश्रम घेतले.