रसायनी दि. 15 (राकेश खराडे ) : रसायनी येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई एच.ओ.सी. कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स, रसायनीला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेद्वारे (छAAउ) त्यांच्या द्वितीय खंडातील मूल्यांकन प्रक्रीयेनंतर 2022-23 या शैक्षणिक वर्षात ए + हे मानांकन मिळाले आहे. त्यांच्या मान्यता देखरेख समितीने कॉलेजला 05 आणि 06 जानेवारी 2022 ला भेट दिली आणि विविध भागधारकांशी चर्चा केली. सदर समितीने अभ्यासक्रमाचा दर्जा, अनुशासन, नेतृत्व, व्यवस्थापन आणि संस्थांत्मक मूल्ये यांचा उच्च दर्जा याची वाखाणणी केली. सदर समिती कॉलेजने सुरु केलेल्या विस्तार कार्यक्रम तसेच पायाभूत सुविधा पाहून प्रभावित झाल

पिल्लई एच.ओ.सी कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स हे महाविद्यालय रसायनी या ग्रामीण भागात वसलेले असून राज्याच्या विविध भागांतून येणार्या हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभिरुचीची पूर्तता करते. सर्वांगीण शिक्षणाच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी महाविद्यालय ग्रामीण भागात असलेल्या गैरसोयी पलीकडे जावून विविध विषयांमध्ये दर्जेदार शिक्षण देत आहे.
डॉ. लता मेनन, प्राचार्य, पिल्लई एच.ओ.सी. कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स म्हणाल्या की ए+ मानांकन हे मुल्यांकन आमच्या शैक्षणिक प्रयत्नांची, विस्ताराची आणि उपक्रमांची पोचपावती असल्याचीच साक्ष आहे.सदर मान्यता पुढील पाच वर्षांसाठी वैध असल्याचे प्राचार्य डॉ लता मेनन यांनी बोलताना सांगितले.यावेळी पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ आर्टंस, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाचे प्रमुख डॉ वासुदेवन पिल्लई, डॉ.जगदीश बाकळ मुख्याध्यापक इंजिनिअर विभाग, डॉ प्रदिप चॅटर्जी मॅनेजमेंट डायरेक्टर, डॉ.चंद्रन पनवेल पिल्लई मॅनेजमेंट डायरेक्टर, दिलिप कुमार रसायनी पिल्लई आर्टंस, सायन्स आणि कॉमर्स शाखेचे मुख्याध्यापक, सुमित म्हात्रे बिएमएस प्रमुख आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते.
े.