कळंबोली दि. 7 (दीपक घोसाळकर) : पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे कोरोना लसीकरण व्हावे यासाठी पनवेल महापालिकेने आरोग्य विभागामार्फत नागरिकांचे लसीकरण आता गृह निर्माण संस्थांमधून जाऊन करण्याचे सुरू केले आहे .आज पनवेल चे कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकुर यांच्या हस्ते कळंबोलीतील गुरुविल्ला हौसिंग सोसायटी मध्ये लस आपल्या दारी या आरोग्यदायी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सदरची नागरिकांच्या हिताची व आरोग्याची काळजी घेणारी ही योजना महापालिकेतील नगरसेवक बबन मुकादम यांच्या प्रयत्नाने साकारली गेली आहे .या योजनेचा फायदा कळंबोलीतील नागरिकांनी चांगला घेऊन उत्तम प्रतिसाद दिला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे या आरोग्य व सामाजिक हेतूने पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आज कळंबोली मध्ये लस आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. कळंबोलीतील गुरुव्हील्ला गृहनिर्माण सोसायटीच्या मध्ये प्रारंभ करताना महापालिकेतील नगरसेवक बबन मुकादम, भाजपाचे कळंबोली शहराध्यक्ष रवीशेठ पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रिया मुकादम , कळंबोली भाजपाचे चिटणीस संतोष गायकवाड, प्रकाश शेलार ,राजन पिल्ले, सोसायटी चे अध्यक्ष जगदीश पाटील, खजिनदार अशोक भोसले, गहीनाथ धुमाळ, दीपक दळवी ,महापालिकेचे डॉक्टर अनिल पाटील , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अप्पा कुंभार ,तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशातील प्रत्येकाची काळजी घेत असून देश कोरोना मुक्त व्हावा यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहेत .केंद्राच्या योजनेतून विविध कल्याणकारी योजना या समाजासाठी त्यांच्याकडून मिळत आहेत. पनवेल महापालिकेच्या माध्यमातूनही नागरी सुविधा व समाजकार्य योजना या कार्यान्वित केल्या जात असून देशाची सुरक्षा व देशाचा विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून साकारला जात आहे. लस आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून कळंबोलीतील जवळपास 75 नागरीकांनी या योजनेचा फायदा घेऊन लसीकरण केले. यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनीही मोलाचे योगदान दिले.