उरण दि. 15 (वार्ताहर) : उरण तालुक्यातील नैना प्राधिकरण क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करणार्या बांधकामांवर आत्ता सिडकोची वक्र दृष्टी झाली असून बुधवारी ( दि15) विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर 198 -1 व 2 येथिल दोन अनधिकृत इमारतीवर सिडकोच्या नैना प्राधिकरणाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुलडोझर फिरवून सदर इमारती जमिनदोस्त केल्या आहेत.

सिडको तथा नैना प्राधिकरण विभागाच्या या कारवाईमुळे या भागातील अनधिकृत इमारत तसेच गोदाम आणि वेअर हाऊस मालकांचे धाबे दणाणले आहेत.सिडकोच्या नैना प्राधिकरणाच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता.