Friday, March 24, 2023
More
  Homeरायगडपेणनामदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पेण नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

  नामदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पेण नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन


  पेण दि.12 (दिपक लोके ) : पेण नगरपरिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नामदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.


  या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील, जि.प. माजी अध्यक्षा निलिमा पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी उपनगरध्यक्षा वैशाली कडू, माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, अविनाश कोळी, महादेव दिवेकर, डी. बी. पाटील, प्रसाद भोईर आदींसह प्रातांधिकारी विठ्ठल इमानदार, तहसिदार स्वप्नाली डोईफोडे, मुख्याधिकारी जीवन पाटील, नगररचना अभियंता सुहास कांबळे, प्रशासन अधिकारी राजाराम नरुटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
  यावेळी बोलताना नामदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले कि, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशाला एक दिशा देण्याचं काम होत असुन देश महासत्तेकडे जाताना तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत. कोरोनाच्या संकट काळामध्ये जवळजवळ 80 कोटी जनतेला गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्याचे काम केले गेले. आपल्या बाजूला असणारे देश पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका यांची या दोन अडीच वर्षांमध्ये काय परिस्थिती झाली आहे तिथे कशा पद्धतीचा वातावरण निर्माण झाले आहे तिथे तिथला असणारा प्रत्येक नागरिक हा कशा पद्धतीने जीवन व्यतीत करत आहेत. आणि आपल्या देशामध्ये आपला देश सुजलाम सुफलाम होत आहे हे आपल्या देशाला लाभलेल्या खंबीर नेतृत्वामुळे शक्य होत आहे.
  पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पाणी समस्या निवारणासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एमएम आरडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी दिला. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं. सबका साथ सबका विकास या तत्त्वावर आपले हे सरकार चालले असून यापुढेही पेण शहरासाठी निधीची कमतरता पडू देणार असे आश्वासन यावेळी नामदार रविंद्र चव्हाण यांनी दिले. यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  error: Content is protected !!
  %d bloggers like this: