नातं विश्वासाचं
नातं परिघाच्या पल्याडचं
नातं भावनांच्या ओलाव्याचं

नातं डोळ्यांत दिसणारं
नातं अश्रूंत सामावणारं
नातं सात्विक भासणारं
दूर असूनही तितकंच
जवळ वाटणारं
नातं क्षितीजाच्या पल्याड असूनही
अंतरात सतत रुंजी घालणारं
नातं काळजी करणारं
तितकंच समजून घेणारं
नातं शब्दांत बांधता न येणारं
नातं मायेची पाखर घालणारं
मायेच्या रुपेरी पंखाखाली विसावणारं
नातं प्रेमाच्या कुंद झऱ्याखाली
सतत न्हाऊन निघणारं
नातं विकासाच्या शिखरावर पोहोचलं
तरी पायथ्याला न विसरणारं
नातं असीम सौंदर्याचं
असंच नातं असतं
माणूसपण जपणारं
अन आनंदाचं , नातं ……….!!!

कवी – सूरेंद्र रामचंद्र पारवे, महाळुंगे , ( मुरुड-रायगड