नवी मुंबई दि. 24 : नेरूळ येथील सार्वजनिक उद्यानांच्या भूखंडावर बेकायदेशीर उभ्या असलेल्या, कृष्णा कॉम्प्लेक्स आणि त्रिमुर्ती दोन इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नोएडा येथिल अनधिकृत ट्वीन टॉवर जमीनदोस्त करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पुनरावृत्ती आता नवी मुंबईत होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई अनधिकृत ट्वीन टॉवर जमीनदोस्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशसर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना लगाम बसेल असा विश्वास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या दोन इमारतीत राहणार्या सुमारे 150 हून अधिक कुटुंबांवर बेघर होण्याची नामुष्की ओढवली आहे.