Sunday, June 11, 2023
More
  Homeसंपादकीयअग्रलेखधोक्याची घंटा...

  धोक्याची घंटा…

  तापमानात वाढ झाल्यामुळे जगभरातील हिमनद्या अतिशय वेगाने वितळत आहेत. त्यामुळे सर्व हिमनदी प्रदेशात नवीन सरोवरे तयार होत आहेत. या सरोवरांच्या क्षेत्रात उद्रेकाची घटना घडल्यास हिमनगांच्या पन्नास किलोमीटरच्या परिघात राहणार्‍या जगातील 15 कोटी लोकांसाठी मोठा धोका ठरू शकतो. यापैकी निम्मे हिमखंड भारत, पाकिस्तान, चीन आणि पेरूमध्ये आहेत. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ब्रिटनमधील ‘न्यूकॅसल युनिव्हर्सिटी’ च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, जगातील 50 टक्के लोकसंख्या धोक्यात आहे. म्हणजे 75 लाख लोक भारतासह या चार देशांमध्ये राहतात. भारतातील 30 लाख आणि पाकिस्तानातील 20 लाख लोकांना याचा ङ्गटका बसू शकतो. या अहवालात ङ्गेब्रुवारी 2021 मध्ये उत्तराखंडमधील चमोली येथे घडलेल्या घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. हवामानबदलाचा सर्वात मोठा धोका तिबेटच्या पठारापासून चीनपर्यंत आहे. या भागात 93 लाख लोक राहतात. ध्रुवीय क्षेत्राबाहेरील एकूण हिमनद्यांपैकी निम्मे पाकिस्तानात आहेत. गिलगिट-बाल्टिस्तान भागात 2022 मध्ये हिमनदी ङ्गुटण्याच्या सोळा घटना घडल्या आहेत; मात्र 2022 मध्ये पाकिस्तानात आलेल्या पुरासाठी हिमखंड वितळणे किती जबाबदार आहे, हे या अहवालात स्पष्ट झालेले नाही.
  न्यूझीलंडच्या ‘कँटरबरी युनिव्हर्सिटी’चे प्रोङ्गेसर टॉम रॉबिन्सन म्हणतात की हिमनदी सरोवराचा उद्रेक हा जमिनीच्या त्सुनामीसारखा आहे. त्याचा परिणाम धरण ङ्गुटल्यावर निर्माण होणार्‍या परिस्थितीसारखा आहे. त्याचा सर्वात मोठा धोका हा आहे की, हे संकट कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय मोठे नुकसान करू शकते. हवामानबदलाच्या परिणामामुळे बर्ङ्ग वितळल्यामुळे तयार झालेल्या सरोवरांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात त्यांच्या पाणलोट क्षेत्रातील लोकसंख्याही वाढत आहे. तलाव ङ्गुटल्यामुळे तितका धोका नसून या तलावांजवळ लोकसंख्येच्या वाढत्या दबावामुळे ङ्गारसा धोका नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. भारताच्या हिमालयीन प्रदेशात असलेल्या सतलज नदीच्या खोर्‍यातील हिमनद्या वितळल्यामुळे अशा तलावांची संख्या वाढत आहे, जी भविष्यात पूर आणि विनाशाचा मोठा धोका बनू शकतात. या बर्ङ्गाळ मैदानात 273 नवीन तलाव तयार झाले आहेत. मानसरोवर ते नाथपा झाकडी भागापर्यंत एकूण 1632 तलावांची मोजणी करण्यात आली आहे. यापैकी 17 तलाव धोक्याच्या चिन्हावर पोहोचले आहेत. त्यापैकी आठ चीनव्याप्त तिबेटच्या प्रदेशात आहेत. त्यांचे क्षेत्र पाच हेक्टरपर्यंत आहे. या तलावांमुळे सतलजचे पाणी वाढून मोठी हानी होऊ शकते. म्हणूनच ही सरोवरे हिमाचल प्रदेश आणि इतर हिमालयीन राज्यांसाठी धोक्याची घंटा आहेत.
  हिमालयातील चिनाब, बियास, रावी आणि सतलज या चार खोर्‍यांमधील हिमनद्या वितळल्याने तयार झालेल्या सरोवरांचं निरीक्षण करण्यात देश आणि राज्यातील भूवैज्ञानिक गुंतले आहेत. सतलज नदीच्या खोर्‍यातील हिमनद्या वितळल्यामुळे तलावांमधील पाण्याचे प्रमाण चार ते पाच टक्क्यांनी वाढल्याचे त्यांच्या अभ्यासातून दिसून आले आहे. भविष्यात त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. वाढत्या तापमानामुळे हिमखंड वितळणे आणि तुटणे यामुळे तलावांचा आकार वाढत आहे. 2005 मध्ये परचू तलाव भूस्खलनाने ङ्गुटला होता. परिणामी, सतलजच्या पाण्याची पातळी वाढली आणि हिमाचल प्रदेशमधील किन्नौर आणि बिलासपूर जिल्ह्यात कहर झाला. काही काळापूर्वी गोमुखाच्या प्रचंड हिमखंडाचा काही भाग तुटून भगीरथीवर म्हणजेच गंगा नदीच्या उगमस्थानावर पडला. ‘गंगोत्री नॅशनल पार्क’च्या वन अधिकार्‍यांनी हिमखंडाच्या तुकड्यांची छायाचित्रं दाखवत ते तुटल्याची पुष्टी केली होती.
  संशोधनानुसार, ऋषी गंगा पाणलोट क्षेत्रातील आठहून अधिक हिमनद्या सामान्यपेक्षा वेगाने वितळत आहेत. साहजिकच यापेक्षा जास्त पाणी वाहून गेल्यास हिमनग तुटण्याच्या घटना वाढणे स्वाभाविक आहे.
  या हिमनगांमधून वाहणार्‍या पाण्याचा दाब एकट्या ऋषीगंगेवर होता.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  error: Content is protected !!
  %d bloggers like this: