Sunday, June 11, 2023
More
  Homeरायगडकर्जतदिवेआगर सुवर्ण गणेशमूर्ती सापडलेल्या व्यक्ती विस्मरणार्थं! मंदिराच्या इतिहासात स्थानच नाही बोलून दाखविली...

  दिवेआगर सुवर्ण गणेशमूर्ती सापडलेल्या व्यक्ती विस्मरणार्थं! मंदिराच्या इतिहासात स्थानच नाही बोलून दाखविली खंत


  माथेरान दि. 18 (मुकुंद रांजाणे) : महाराष्ट्र मधील रायगड जिल्ह्यातील सुवर्ण गणेश नगरी म्हणून अल्पावधीतच प्रसिद्ध पावलेल्या दिवेआगार येथे ज्या व्यक्तीने खोदकाम करताना ही गणेश मूर्ती द्रौपती पाटील यांच्या शेतातून काढली त्या विराज पाटील व शेताच्या मालकीण असलेल्या श्रीमती द्रौपती पाटील यांचा सुवर्ण गणेश मंदिर व्यवस्थापनाला विसर पडला असून विश्वस्त मंडळात द्रौपती पाटील यांना स्थान नसल्याने गावकर्‍यांमध्ये नाराजी चा सुर दिसून येत आहे.


  दिनांक 17 नोव्हेंबर 1997 रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीमती द्रोपती धर्मा पाटील यांच्या शेतामध्ये श्री विराज पाटील हे खोदकाम करीत असताना त्यांना एक तांब्याची पेटी आढळून आली ती पेटी उघडली असता आत मध्ये सुवर्ण गणेशाची मूर्ती आढळून आली या गणेश मूर्तीची तेथील गणेश मंदिरामध्ये स्थापना करण्यात आली परंतु 24 मार्च 2012 मध्ये या मंदिरावर दरोडा पडून ही मूर्ती चोरण्यात आली होती त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठी खळबळ माजली होती परंतु पोलिसांनी या चोरांना बंदिस्त करून गणपती मूर्ती वितळवल्याने हे सोने जप्त करण्यात यश मिळविले होते
  मा. उच्च न्यायालयाने 31 मार्च 2000- 2019 साली दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी जप्त केलेल्या सोन्याचे पुनर्घडणावळ करून गणेश मुखवटा तयार करून त्याची स्थापना केली होती. या मुखवट्याचे मंदिराचे देखभाल करण्याकरिता एक विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात आले परंतु हे विश्वस्त मंडळ स्थापन करताना गावकर्‍यांना विश्वासात न घेता हे मंडळ स्थापन झाल्यामुळे गावकर्‍यांनी थेट धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे विश्वस्त मंडळ स्थापन करताना ज्यांच्या शेतामध्ये ही गणेश मूर्ती सापडली त्यांना स्थान देण्यात आले नव्हते व त्यानंतरही त्यांना सातत्याने डावलले गेले मंदिरामध्ये काम करीत असलेल्या कर्मचार्‍यांकडे चौकशी केली असता ही गणेश मुखवटा सापडणार्‍या व्यक्तीचे नावच कुणास ठाऊक नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळेच कोणताही स्वार्थ मनी न बाळगता ही गणेश मूर्ती गावाला अर्पण करणार्‍या निस्वार्थ श्रीमती द्रोपती धर्मा पाटील व विराज पाटील यांना कुठेतरी डावलले जात असल्याची भावना श्री विराज पाटील यांनी बोलून दाखविली.
  सुवर्ण गणेश मुखवटा सापडल्या नंतर दिवेआगर गावाचे रूपच पालटले असून पर्यटन दृष्ट्या दिवे आगर हे नाव आता सर्व दूर पोहोचले आहे.
  शेतामध्ये खोदकाम करीत असताना हा गणेश मुखवटा सर्व प्रथम मिळाल्या नंतर शासनाकडे कोणतीही अपेक्षा न करता हा मुखवटा गावामध्येच रहावा अशी विनंती तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांना त्यावेळी केली होती त्यानुसार हा गणेश मुखवटा येथील मंदिरामध्ये स्थापन करण्यात आला आहे.
  विराज पाटील ः दिवेआगर ग्रामस्थ
  मंदिरामध्ये सध्या अस्तित्वात असलेले विश्वस्त मंडळ नोंदणी करताना तहयात कमिटी असेल अशी नोंदणी करण्यात आली होती त्या करिता मा.धर्मादाय आयुक्त अलिबाग यांच्या कडे दाद मागून तहयात मंडळ बरखास्त करून नवीन मंडळ स्थापन करावे अशी मागणी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. ः संजय मुकुंद पाटील ग्रामस्थ दिवेआगर

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  error: Content is protected !!
  %d bloggers like this: