लग्नगाठ बांधण्याचा विचार पुन्हा आहे
गतआनंद प्राप्तीचा विचार पुन्हा आहे

सोसले कितीक आजवरी जे ज्ञात आहे
ते सर्व विसरण्याचा विचार पुन्हा आहे
आधाराची असेल गरज ज्या इसमास
तिथे सेतू बांधण्याचा विचार पुन्हा आहे
मानवतेचे मंदिर स्वप्नांत पाहिले मी
ते सत्यात उभारण्याचा विचार पुन्हा आहे
जीवन एक न उलगडलेले गूढ कोडे
जाता-जाता सोडवण्याचा विचार पुन्हा आहे
वाटते सांगावे दुःखाला थांब तू जरासा
सुखाचा तळ शोधण्याचा विचार पुन्हा आहे
बहरलेला तो वसंत अनुभवताना
दिलखुलास जगण्याचा विचार पुन्हा आहे

कवी - सुरेंद्र रामचंद्र पारवे
महाळुंगे , ( मुरुड-रायगड )