रसायनी दि. 1 (राकेश खराडे ) : स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी थोर निरुपणकार महाराष्ट्र भुषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने जन्मशताब्दी निमित्त डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी बुधवारी एकदिवसीय स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी रसायनी पाताळगंगासह कोन विभागातील हजारो श्री सदस्यांनी सकाळपासूनच उपस्थित राहून स्वच्छता मोहीम राबविली.

मोहोपाडा,रसायनी पाताळगंगासह पनवेल तालुक्यातील हजारो श्री सदस्यांनी बूधवारी सकाळी पनवेल येथील पंचमुखी हनुमान मंदिर ते गार्डन हॉटेल तसेच परिसरातील इतर भागात जमून हातात झाडू,फावडे,घम्याल, पिशव्या घेऊन पनवेल महानगरपालिका परिसरातील मुंबईच्या तसेच पुण्याच्या दिशेने जाणार्या रस्त्याची स्वच्छता केली.हि मोहिम बुधवारी सकाळी महाराष्ट्रासह परदेशातही राबविण्यात आली.स्वच्छता मोहिमेमुळे परिसरातील शासकीय कार्यालये व रस्ते चकाचक झाल्याचे दिसून आले.यावेळी स्वच्छता मोहीम राबविताना एकोप्याचे दर्शन झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे यावेळी श्री सदस्यांकडून जमा झालेल्या कच-याची योग्य विल्हेवाटही लावण्यात आली.डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छतेसाठी रसायनी कोन विभागातील ठिकठिकाणच्या हजारो श्री समर्थ अनुयायांनी उपस्थित राहून महास्वच्छता मोहीम राबविल्याने जनमानसातून लोकप्रियता मिळत आहे.