उरण दि. 22 (घन:श्याम कडू) आज जेएनपीए व्यवस्थापनाबरोबर झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने उद्यापासून सुरू होणारे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड वाटप मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 23 मे पासून बेमुदत सामुदायिक उपोषण स्थगित करण्यात येणार होते. मात्र आज जेएनपीटी व्यवस्थापनासोबत साडेबारा टक्के भूखंड वाटप मागण्यांसाठी बैठक घेण्यात आली.

सदर बैठक जेएनपीए प्रशासन भवनात बंदराच्या सचिव तथा मुख्य प्रबंधक मनीषा जाधव यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत समझोता करार( चजण) झाल्या पासून 36 महिन्यात प्लॉट चा ताबा देण्याचे मान्य केले व अंतीम निर्णय लवकरात लवकर सिडको सह व्यवस्थापनाक श्री कैलाश शिंदे व जेएनपीटी डेप्युटी श्री उन्मेष वाघ यांचे सोबत घेऊन सदर प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. यामुळे उद्या पासून आयोजित करण्यात आलेले बेमुदत सामुदायिक उपोषण सर्वांनुमत्ते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी भूषण पाटील, प्रा.एल. बी. पाटील सर, रामचंद्र म्हात्रे, संतोष पवार , रमाकांत म्हात्रे, संतोष घरत, जगदीश तांडेल, संजय ठाकुर, सुनिल पाटील व प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.