Sunday, June 11, 2023
More
  Homeनवी मुंबईउरणजेएनपीए प्राधिकरणच्या उत्कृष्टतेची आणि कामगिरीची गौरवशाली 34 वर्षे साजरी

  जेएनपीए प्राधिकरणच्या उत्कृष्टतेची आणि कामगिरीची गौरवशाली 34 वर्षे साजरी

  उरण दि.25 (घन:श्याम कडू) ः जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरण (जेएनपीए) हे भारतातील सर्वात मोठे सरकारी कंटेनर बंदर आहे, जे 26 मे रोजी 34 वर्षे पूर्ण करत आहे. जागतिक बँकेने जेएनपीएला जगातील अव्वल परफॉर्मर म्हणून स्थान दिले असताना जेएनपीएच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

  अत्याधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि 34 वर्षांपासून ग्राहकांच्या समाधानासाठी अतूट वचनबद्धतेसह जेएनपीए सागरी उद्योगात उत्कृष्टतेचे प्रतिक म्हणून उदयास आले आहे. लक्षणीय प्रमाणात मालवाहतूक हाताळत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक महत्त्वपूर्ण प्रवेशद्वार म्हणून जेएनपीए सर्वात प्रगत बंदर म्हणून क्रांती घडवत आहे. मुंबईजवळील न्हावाशेवा येथे असलेले बंदर, मूळतः भारताच्या आर्थिक राजधानीच्या मध्यभागी असलेल्या आणि जवळपासच्या दशकापूर्वीच्या मुंबई बंदराची गर्दी कमी करण्यासाठी तयार करण्यात आले होते. दोन सर्वात तरुण बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदराचा उदय नेत्रदीपक होता. हे भारतातील निम्म्याहून अधिक कंटेनरचे प्रमाण समुद्रमार्गे पाठवते. जेएनपीए भारतातील एकमेव असे बंदर आहे जिथे जगातील प्रमुख तीन कंटेनर टर्मिनल ऑपरेटर- पीएसए इंटरनॅशनल, डीपी वर्ल्ड आणि एपीएम टर्मिनल्स या बंदरावर सुविधा चालवतात.

  जागतिक बँकेचा लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स (एलपीआय) अहवाल, 2023 हा बंदराच्या उत्कृष्ट कामगिरीच्या शीर्षस्थानी आला तर मार्च 2023 मध्ये 6.05 दशलक्ष ढएणी चा विक्रमी उच्च मालवाहू परिमाण गाठला. जवाहरलाल नेहरू बंदर केवळ 22 तास किंवा अवघ्या 0.9 दिवसांत बॉक्स शिप्स नेते, हे जागतिक बँकेने त्यांच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स (एलपीआय) अहवाल, 2023 मध्ये केलेले निरीक्षण हे बंदर व्यवस्थापनाच्या प्रयत्नांचा पुरावा आहे, ज्याला टर्मिनल ऑपरेटर्स आणि इतर स्टेक होल्डर्सचा समर्थपणे पाठिंबा आहे. कार्गो हाताळणीतील सध्याच्या ट्रेंडच्या अनुषंगाने, जेएनपीएने मालवाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी तांत्रिक साधनेदेखील स्वीकारली आहेत ज्यामुळे व्यवसाय करणे सुलभ होते.

  जेएनपीएचा जागतिक दर्जाचे बंदर म्हणून सुरू असलेला प्रवास हा भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लावत आहे. जागतिक पुरवठा साखळीत कंटेनरायझेशनचा समावेश झाल्याने स्टीलच्या कंटेनरमध्ये माल नेण्यात या बंदराची मोलाची भूमिका आहे, असे माननीय श्री. सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री म्हणाले. जेएनपीएद्वारे प्रदर्शित केलेली कार्यक्षमता आणि उत्पादकतेची जगातील सर्वोत्कृष्ट मापदंडांशी तुलना केली जाते. भारताच्या निर्यात-आयात समुदायाच्या विकासासाठी खाजगी भागीदार आणि बंदर व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शक्य झाले आहे, असेही ते पुढे म्हणाले. जवाहरलाल नेहरू बंदर हे 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांना समर्थन देत जागतिक दर्जाची बंदरे बांधण्याचा संकल्प करत असताना ही केंद्र सरकारसाठी निश्चितच अभिनास्पद बाब ठरली आहे.

  बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, भारत सरकार, ग्राहक, कर्मचारी आणि स्थानिक समुदायासह आमच्या भागधारकांच्या अतुलनीय पाठिंब्याशिवाय हे सर्व शक्य झाले नसते. सतत नावीन्य, विस्तार आणि सेवा उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध राहून, आम्ही ग्लोबल मॅरिटाईम हब बनण्याच्या आमच्या ध्येयासाठी समर्पित आहोत, असे माननीय श्री. संजय सेठी, आयएएस, जेएनपीएचे अध्यक्ष म्हणाले. जेएनपीएने वर्धापन दिनानिमित्त 25 मे 2023 रोजी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माननीय श्री. सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री प्रमुख पाहुणे होते. व्यापार आणि जेएनपीए कर्मचार्‍यांमधील अव्वल कामगिरी करणार्‍यांना माननीय मंत्री श्री. सोनोवालजी, श्री संजय सेठी, आयएएस, अध्यक्ष, जेएनपीए, श्री. उन्मेष शरद वाघ, खठड, उपाध्यक्ष, जेएनपीए, मंत्रालयाचे अधिकारी, सागरी क्षेत्रातील भागधारक, जेएनपीएचे अधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी इतर मान्यवरदेखील उपस्थित होते.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  error: Content is protected !!
  %d bloggers like this: