रसायनी दि. 15 (राकेश खराडे ) : रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या माध्यमातून रसायनी परिसरातील काही शाळांचा सोलर पॅनल बसविण्यासाठी सर्वे करण्यात आला होता.यात जनता विद्यालय मोहोपाडा शाळेने आवश्यक त्याकागदपत्रांची पुर्तता केली होती.त्या मागणीनुसार मंजूर झालेल्या ग्लोबल ग्रँट मधील 5 घत सोलर पॅनेल जनता विद्यालय मोहोपाडा शाळेत बसविण्यात आला.त्याचे उदघाटन रोटरीयन तथा महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई संदिप मुंढे यांच्याहस्ते करण्यात आले.

डिस्ट्रिक्ट ग्रँटचे प्रमुख चारू शोत्री , संतोष मराठे,राऊत तसेच खोपोली क्लबचे अध्यक्ष रोटरीयन सुरेंद्र जोशी,दिवाकरन पिल्लई ,लोणावळाचे अध्यक्ष आशिष मेहता,कर्जतचे अध्यक्ष सतीश श्रीखंडे उपस्थित होते .
या कर्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष अमित शाह, सेक्रेटरी डॉ. धीरज जैन,पिई रोटरीयन रेश्मा कुरूप,माजी अध्यक्ष गणेश काळे, बाळकृष्ण होणावळे सर, गणेश म्हात्रे, सुनील कुरूप,रोटरीयन ऋतुजा भोसले, सुनील भोसले, शशिकांत शानबाग, सुशांत उचिल , मेघा कोरडे, सचिन थोरात, देवेंद्र महिंद्रीकर, शारदा काळे, वर्षा पाटील, रंजना माथूर आदी उपस्थित होते.