रसायनी दि. 2 (राकेश खराडे) : अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिणपिठ नाणीजधाम महाराष्ट्र यांचा पादुका दर्शन सोहळा उत्तर रायगड जिल्ह्यात जे.एस.एम. कॉलेज मैदान, अलिबाग शहर, ता. अलिबाग. जि. रायगड या ठिकाणी शनिवार , दिनांक : 11 मार्च 2023 रोजी, सकाळी 10:00 पासून संपन्न होत आहे.

या दिवशी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुकांसमवेत गुरुपुजनाचा, उपासक दिक्षेचा, प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ उपस्थित भाविक भक्तांना व हितचिंतकांना मिळणार आहे. तसेच या दिवशी कार्यक्रम ठिकाणी हजारो हितचिंतक भक्त/उपासक दीक्षा घेणार असून जगतगुरु नरेद्र महाराज संस्थानच्या सामाजिक उपक्रमांतर्गत इयत्ता 8 ते 10 मधील आदिवासी विद्यार्थ्यांना जे रोज 4 ते 5 कि.मी. पायी प्रवास करतात अशा 52 विद्यार्थांना मोफत 52 सायकलींचे वाटप करण्यात येणार आहेत. अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची सांगड घालून सुखी जीवन कसे जगता येईल, मानवी मनाचा विकास कसा साध्य होईल, तसेच भारतीय संस्कृतीचे जतन यावर उद्धबोधक मार्गदर्शन प्रवचनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.असे स्व-स्वरूप संप्रदाय – जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड यांनी आवाहन केले आहे.