मकरेतील सूर्याला,
हात जोडूनी गाऊ गाणी
शक्ती तेज देवतेस,

नम्र वंदुनी, गाऊ गाणी
तिळगुळ देऊ घेऊ
मोद साठवू मनी
फुलवूया नी खुलवुया,
कळ्यांस हासुनी
बाल अरुण तरुण प्रौढ,
वृद्ध नाचुनी, गाउ गाणी
प्रांत जात पात पक्ष भेद विसरूनी… गाउ गाणी
तीळ तीळ वाढुनीच,
प्रेम गाढ वाढते,
मधुर गोड ओढीतून,
ऋदय वेढिते
तिळगुळ घ्या नि द्या
करा करातुनी, गाऊ गाणी
आनंद मोद नाचू द्या
घराघरातून गाऊ गाणी
नाळ नाळ जोडूनी
महान राष्ट्र संभवे
नजीक ठेपले दहा-दिशांतुनी दिवे
प्रज्वलित दिव्य ज्योत,
सर्व व्यापुनी, गाऊ गाणी
इथे महान लोकतंत्र
रामराज्य स्थापूनी, गाऊ गाणी

वैजनाथ जोशी
बदलापूर