रसायनी दि. 26 (राकेश खराडे ) : रायगड जिल्ह्यात आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा उमटविणार्या करिअर कोचिंग क्लासचा विद्यार्थी कु.सुमित डे याने इयत्ता 12 वी वाणिज्य विभाग मधून (95.67%) गुण मिळवून खालापूरसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.खोपोली शहरातील करिअर कोचिंग क्लासेस ही नावाजलेली संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेतील विद्यार्थी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.या संस्थेचे सर्वेसर्वा मुफद्दर हे स्वतः मुलांच्या गुणवत्तेकडे लक्ष देत असतात त्यामुळे येथील विद्यार्थी दरवर्षी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असल्याचे दिसून येते.

यंदा जिल्ह्यातून स्मृति मिरवणकर (92.67%) गुण मिळवून दुसरी आली असून मुलींमधून तिने पहिले येण्याचा बहुमान पटकाविला आहे.
गेल्या 18 वर्षापासून खोपोली शहरात करिअर कोचिंग क्लासेस विद्यादानाचे कार्य करत आहे. याआधी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करून त्यांना यशाच्या शिखरावर पोहचवण्याचे कार्य संस्थेने केले आहे.
कु. सुमित डे बरोबरच करिअर कोचिंग क्लासमधील इतर अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे. यात वाणिज्य शाखेतून सार्थक मिंडे ह्यास (91.50%), सिद्धेश मुसळे (91.17%), यश हुनगुंड ह्यास (89.67%), रिद्धी शानबाग (89%) यांचा समावेश आहे. आणि विज्ञान विभागातून विधी माने (88.17%) गुण मिळवून कॉलेजमधून दुसरी व क्लास मधून विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान पटकविला आहेत.
या क्लास मध्ये आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास कसा होईल आणि त्याची गुणवत्ता आधीपेक्षा कशी जास्त वाढेल यावर संस्थेच्या प्रत्येक सदस्याचे बारीक लक्ष असते ते विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर अधिक भर देत असतात. यामुळेच दरवर्षी या संस्थेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकतात’ असे प्रतिपदन करिअर क्लास चे संचालक मुफद्दल सर यांनी केले आहे तसेच सरांनी खोपोलीकरांनी या क्लासवर विश्वास ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहे.
आमच्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा एकसारखाच असल्याचे समजून त्यांना मार्गदर्शन केले जाते.येथे येणार्या कोणत्याही विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता काय आहे हे पाहिले जात नसून त्याची बौध्दिक क्षमता कश्या पध्दतीने वाढविता येईल याचा प्रयत्न केला जातो.आम्ही सर्व विद्यार्थ्यांकडे समान नजरेने पाहत असतो आमचा प्रत्येक विद्यार्थी हा गुणवत्ता प्रधान बणावा हाच आमचा दृष्टीकोन असतो.