Friday, March 24, 2023
More
  HomeMainनवी मुंबईकोकण भवनमध्ये शासकीय कर्मचारी शंभर टक्के संपावर

  कोकण भवनमध्ये शासकीय कर्मचारी शंभर टक्के संपावर

  नवी मुंबई दि. 14 (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात कोकण भवनमधील जुनी पेन्शन हक्क समितीतील तृत्तीय व चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनी काम बंद संपाच्या पहिल्याच दिवशी 100 टक्के सहभागी होऊन बेमुदत संप यशस्वी केला. कोकण भवनातील सर्व विभागातील जुनी पेन्शन हक्क समितीतील तृत्तीय व चतुर्थ श्रेणी कर्मर्‍यानी काम बंद बेमुदत संपात सहभागी झाल्याने कामानिमित्त कोकण भवनात येणार्‍या अभ्यागतंची मोठया प्रमाणात गैरसोय झाली.

  बृन्हमुंबई राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस मोरेश्वर चौधरी, उपाध्यक्ष अस्मिता जोशी महिला संघटक मंगला कुलकर्णी, जुनी पेन्शन हक्क समिती कोंकण विभागाच्या अध्यक्ष वंदना कोचुरे, कार्याध्यक्ष माधुरी डोंगरे, उपाध्यक्षा अश्विनी धुमाळ, सचिव अजित न्यायनिरगुने, सचिव अर्पणा गायकवाड, कोषाध्यक्ष विनोद वैदु, विद्युत विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकात पवार, वर्ग 4 च्या विभागीय उपाध्यक्षा जनाबाई साळवे तसेच सदस्य नरेश वाघमारे, श्याम लगाडे, आदीनी संप यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  error: Content is protected !!
  %d bloggers like this: