रान फुलांचे फुलून आले
कुतूहल माझे जागे झाले

क्षितिजावरती इंद्रधनू
सप्तरंगात धुंद न्हाले
मनाप्रमाणे जगावयाचे
दिवस आजि संपून गेले
किलबिल होता पानोपानी
रंग मनाचेही उधळले
वसंतातल्या स्वप्नील क्षणी
शिशिरासही पंख लाभले

कवी – सुरेंद्र रामचंद्र पारवे
महाळुंगे ( मुरुड-रायगड )