नवीन पनवेल दि. 23 : पनवेल येथील कल्पतरू सोसायटीतील सांस्कृतिक समितीतर्फे पूर्ण वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये गुढीपाडव्यापासून सुरुवात केली जाते. 22 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सोसायटीमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, स्वातंत्र्य दिन, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दीपावली, इंग्रजी नववर्ष स्वागत, प्रजासत्ताक दिन,होळी उत्सव, महिला दिन ,बाल दिन व स्पोर्ट्स वीक अशा पद्धतीचे सर्व कार्यक्रम पूर्ण वर्षभरामध्ये होतात. जसं भारत विविधतेने नटलेला आहे तसंच कल्पतरू सुद्धा विविधतेने नटलेला आहे. तिथे सर्व प्रांतातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. आणि त्या सर्व प्रांतातील लोकांचे सर्व सणांचे उत्तमरीतीने सादरीकरण केलं जातं. या सर्व कार्यक्रमासाठी तेथील रहिवासी उत्स्फूर्त सहभाग घेतात त्यातल्या त्यात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
येथील महिला कमिटी सदस्य सीमा ठाकूर , प्राजक्ता पाटील, स्वाती सेठीया व पुरुष सदस्य मनोज महादेव आंग्रे व इतर तसेच तिन्ही सोसायटीचे चेअरमन प्रशांत बाळाराम ठाकूर ,पनीर सेलवम व तळेकर यांचा खूप चांगल्या प्रकारे पाठिंबा असतो. या कार्यक्रमाचं पूर्णपणे नृत्यदिग्दर्शन रोशन रमेश आंग्रे यांच्या रोशन डान्स अकॅडमी यांनी कार्यक्रमकरण्यासाठी मेहनत घेतली आहे.