जगभरात, विशेषत: मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण इतके वाढले आहे की, लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. प्रदूषणामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून तज्ज्ञांच्या मते, प्रदूषणाबाबत आगामी काळात ठोस पावले उचलली न गेल्यास प्रदूषणाचे परिणाम आणखी धोकादायक बनू शकतात. वातावरणातील ओझोनचा थर सतत खराब होत आहे. ओझोनचा थर पृथ्वीला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. या थराला होणार्या नुकसानीमुळे लोकांच्या जीवाला असलेला धोका सातत्याने वाढत आहे. ओझोन हा वायू वातावरणात असतो, त्याचा रंग हलका निळा असतो. ओझोनचा थर पृथ्वीपासून 50 किलोमीटर अंतरावर स्ट्रॅटोस्ङ्गियरमध्ये आढळतो. ओझोन थराला ओझोन ढालदेखील म्हणतात. कारण ओझोन सूर्यापासून हानिकारक अतिनील किरणे शोषून घेतो आणि अतिनील किरणांना पृथ्वीवर पोहोचण्यापासून अडवतो. या किरणांमुळे कर्करोगासारखे अनेक घातक आजार होऊ शकतात.
ओझोनच्या थराला नुकसान करणार्या प्रदूषणाला ओझोन प्रदूषण म्हणतात. ओझोन प्रदूषण ही आजची एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे बहुतेक श्वसनविषयक समस्यांचा धोका वाढतो. जंगलतोड, पाणी प्रदूषण यामागील मुख्य कारण असून रेङ्ग्रिजरेटर आणि एसीसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापरही ओझोनसाठी घातक आहे. ओझोन थर आणि आरोग्य यांचा थेट संबंध आहे. प्रदूषणामुळे ओझोनचा थर तुटत आहे. ओझोन प्रदूषणामुळे श्वासोच्छवासाचा त्रास, दमा, खोकला आणि वेदना, ङ्गुफ्ङ्गुस कमजोर होणे, जळजळ, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास आणि छातीत दुखणे असे प्रकार वाढत आहेत. ओझोन प्रदूषण प्रत्येकाला प्रभावित करते; परंतु त्याचा सर्वात जास्त परिणाम दमा आणि ङ्गुफ्ङ्गुसाच्या आजाराच्या रुग्णांवर होतो. याशिवाय वृद्ध, लहान मुले आणि घराबाहेर जास्त वेळ घालवणार्या व्यक्तींना सर्वाधिक धोका असतो. असे असले तरी ओझोनचा थर पूर्वीसारखा व्हावा, म्हणून जागतिक पातळीवर सुरू झालेले प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहेत. ओझोनचा थर पुढील चार दशकांमध्ये पूर्ण पुनर्प्राप्ती करील, अशी आनंदाची बातमी आहे, जी पर्यावरणप्रेमी आणि आपल्या ग्रहाच्या हितचिंतकांना रोमांचित करणारी आहे. त्यातून नव्या शक्यता आणि नव्या आशाही निर्माण झाल्या आहेत. एवढी मोठी खगोलीय समस्या सोडवता येत असेल, तर पृथ्वीच्या पर्यावरणीय आणि हवामानाच्या समस्या का सुटू शकत नाहीत?
1980 चे दशक पृथ्वीच्या जीवनाला आधार देणार्या ओझोन थरामध्ये छिद्र पडल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. त्यामुळे जीवसृष्टीला मोठे धोके निर्माण झाले होते. ती चिंता आजही माणसाच्या मनात आहे. ओझोनचा क्षय होत गेला तसतसा त्याचा जीवरक्षक थर इतका पातळ झाला की लोक त्याला छिद्र म्हणू लागले; पण या वर्षी जानेवारीमध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) आणि जागतिक हवामान संघटनेने (डबल्यूएमओ) जारी केलेल्या अहवालात ओझोनच्या थरातील छिद्र हळूहळू भरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पर्यावरणवादी आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या भुवया उंचावल्या आहेत. संशोधकांच्या मते, 2018 च्या तुलनेत ओझोनच्या थराच्या जाडीत लक्षणीय वाढ झाल्याचे आढळून आले असून येत्या चार दशकांमध्ये हा थर पूर्णपणे पूर्वस्थितीत येईल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यूएन-समर्थित वैज्ञानिकांचा गट ओझोन थराच्या बरे होण्याच्या प्रक्रियेला हवेतील रसायनांमध्ये घट झाल्याचे कारण देतो. अहवालात दिसून आले आहे की जवळजवळ 99 टक्के ओझोन कमी करणारे प्रतिबंधित पदार्थ वातावरणातून टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात येत आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणातील स्ट्रॅटोस्ङ्गियर विभागातील ओझोनचे प्रमाण वाढत आहे आणि त्याचा थर घट्ट होत आहे. अनेक दशकांपासून क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि हॅलोन्समुळे मानव आणि इतर सर्व सजीवांचे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणार्या सुमारे 15 ते 30 किलोमीटर उंचीच्या वातावरणातील ओझोन थराचे नुकसान होत आहे. खराब झालेला ओझोन थर हा त्वचेचा कर्करोग आणि मोतीबिंदूचा वाढता प्रसार, कृषी उत्पादकता कमी होणे आणि सागरी परिसंस्थेतील व्यत्यय यासारख्या घातक बदलांशी संबंधित आहे.