Sunday, June 11, 2023
More
    Homeरायगडकर्जतएक्स्प्रेस खाली येणार्‍या वयोवृद्धाचे कर्जत लोहमार्ग पोलिस निकेश तुरडे यांनी वाचविले प्राण

    एक्स्प्रेस खाली येणार्‍या वयोवृद्धाचे कर्जत लोहमार्ग पोलिस निकेश तुरडे यांनी वाचविले प्राण

    कर्जत दि. 24 (जयेश जाधव) : एक्स्प्रेस खाली येणारा बासष्ट वर्षीय एक वयोवृद्ध इसम रेल्वे रूळ ओलांडताना पडला मात्र तेथे गस्त घालत असताना कर्जत लोहमार्ग पोलिसाने आपल्या जीवाची बाजी लावत त्या वृध्दाचे प्राण वाचविले आहेत. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.दरम्यान या पोलीस कर्मचार्‍याचे सर्व स्थरातून कौतुक होत असून पोलीस अंमलदार निकेश तुरडे असे या कर्तव्यदक्ष रेल्वे पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे.

    याबाबत माहिती अशी की दिनांक 12/05/2023 रोजी प्रवासी नामे – प्रशांत विजय चव्हाण वय – 62 वर्ष . राहणार- A- 712, साई दर्शन सोडेवाला लॉन बोरिवली (W). हे सकाळी 10:30 वा.च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्र – 02 वरून रेल्वे रुळ ओलांडत असताना प्लॅटफॉर्म क्र-1वर गस्त करीत असलेले, पो. हवा 3316 पाटील, पो. शी 062-18 तुरडे, पो. शी 1198 शेख, पो. शी 553 मोहिते , पो. शी 1752 पेरणेकर, पो.शी 024 उमाळे, दिघे असे गस्त करीत असताना सकाळी 10:30 च्या सुमारास पुणे दिशेकडून मुंबई दिशेकडे वेगाने जाणारी कर्जतला न थांबणारी गाडी नं -19668 हमसफर एक्स्प्रेस जात असताना एक वयस्कर इसम रेल्वे रुळ ओलांडत असताना भरधाव वेगाने येणारी गाडी पाहून घाबरून येणार्‍या गाडीच्या रेल्वे रुळावर इसम पडला हे पाहताच मोटरमन ने गाडीचा स्पीड कमी केला वेळीच गुन्हे तपास पथकातील पो.शी 062-18 निकेश तुरडे हे तसेच त्यांच्यासोबत होमगार्ड 4705 दिघे या दोघांनी वेळेत धाव घेऊन तेथील वयोवृद्ध इसमास रुळावरून उचलून बाहेर केले व त्यांचे प्राण वाचवले.त्यामुळे कर्जत लोहमार्ग पोलिसांचे कौतुक होत आहे .

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    error: Content is protected !!
    %d bloggers like this: