पनवेल दि. 24 (साहिल रेळेकर) : काँग्रेस नेते आर सी घरत यांचे जेष्ठ बंधू रामदास चंदर घरत यांचे गुरुवार दि.18 मे रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

आज (दि.24 मे) शेकाप सरचिटणीस विधानपरिषद आमदार जयंत पाटिल यांनी पनवेल तालुक्यातील वरचे ओवळे, सेक्टर 1 नवीन वसाहत येथे काँग्रेस नेते आर सी घरत, दिलीप घरत यांच्या निवासस्थानी घरत कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. याप्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटिल, माजी आमदार मनोहर भोईर, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटिल, कार्याध्यक्ष अभिजीत पाटिल, सरचिटणीस प्रताप गावंड, रमेश म्हात्रे, एपीएमसी संचालक देवा पाटिल, अमित लोखंडे आदि उपस्थित होते.