Saturday, March 25, 2023
More
    Homeनवी मुंबईउरणआंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत आफ्रिका दौर्‍यावर रवाना

    आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत आफ्रिका दौर्‍यावर रवाना


    उरण दि. 13 : कामगार क्षेत्रातील एक दिग्गज नांव, कामगारांचे गाव ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणारे डॅशिंग कामगार नेते आंतरराष्ट्रीय वाहतूक संघ (खढऋ ) च्या वाहतूक विभागाचा परीषदेसाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग साठी आज सपत्निक रवाना झाले.

    सातत्याने बंदर व वाहतूक कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्न विचारून कामगारांना जागतिक पातळीवर न्याय देण्याचा महेंद्रजी घरत यांचा प्रयत्न असतो. छचॠघड संघटनेकडे असलेल्या 250 विविध कंपन्यांच्या नेतृत्त्वाने व विशेषत: बंदरातील कामगारांच्या नेतृत्वामुळे महेंद्र घरत यांचा आंतरराष्ट्रीय कामगार क्षेत्रात दबदबा निर्माण झालेला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन सातत्याने न थकता 1987 पासून गेली 36 वर्षे ते कामगार क्षेत्रात धडाडीने काम करीत आहेत. हजारो कामगारांना महाराष्ट्रात न्याय देत असताना देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर खछढणउ , खढऋ व खङज चे प्रतिनिधित्व करीत आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    error: Content is protected !!
    %d bloggers like this: