Sunday, June 11, 2023
More
  Homeपनवेलपनवेल शहरअ‍ॅड नितीन मोहिते यांना पितृशोक

  अ‍ॅड नितीन मोहिते यांना पितृशोक

  पनवेल दि.24 (वार्ताहर) : खालापूरमधील नामांकित नामांकित ऍड नितीन मोहिते यांचे वडील कृष्णा रामा मोहिते यांचे वयाच्या 69 व्या वर्षी आकस्मित निधन झाल्याने मोहिते कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  चळवळीतील निष्ठावान सैनिक असलेलले दिवगंत कृष्णा रामा मोहिते यांचे ह्दयविकाराने दुःखद निधन झाले. कृष्णा मोहिते यांनी गेली अनेक वर्षे मस्को कंपनीत इमानदारीनी मेल्टींगशॉपमध्ये नोकरी केली. वासरंग येथील सामाजिक क्षेत्रातील चांगले कामाची पोहचपावती असणारा समाज सेवक काळाच्या पडद्याआड निघून गेल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर शोक सभा व पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम 26 मे रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरी खालापूर तालुक्यातील वासरंग गावी होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती ऍड नितीन मोहिते यांनी केली आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  error: Content is protected !!
  %d bloggers like this: